भारतीय लष्कराच्या नावाने तरुणांना फसवण्यासाठी बनावट ई-मेल पाठवले जात असून, दरमहा ७५ हजार रुपये स्टायपेंडचे आमिष दाखवले जात आहे. महाराष्ट्र सायबर पोलिसांनी या फिशिंग प्रकाराबाबत सावधगिरीचा इशारा दिला आहे. खरी इंटर्नशिप योजना असली तरी अर्ज केवळ अधिकृत पोर्टलवरूनच करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
आर्मी इंटर्नशिपच्या नावाने फसवणूक; सायबर पोलिसांचा इशारा
Source: Pudhari