कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी हिंगोली जिल्ह्यातील लिंबाला गावातील सरकारी शाळेतील मुख्याध्यापकाचा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. व्हिडिओत मुख्याध्यापक वर्गात झोपलेले आणि बाटली घेऊन जाताना दिसत आहेत. दीपकेंनी मुख्याध्यापकांवर मद्यपानाचा आरोप करत निलंबनाची मागणी केली आहे. निलंबन न केल्यास मंगळवारी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
मुख्याध्यापकाचा व्हिडिओ व्हायरल; अभिजीत दीपकेंचा आंदोलनाचा इशारा
Source: Sarkarnama