वाराणसीच्या लाल बहादूर शास्त्री विमानतळावर शिंदे गटाचे माजी नगरसेवक कमलेश राय यांच्या पिस्तुलातून अपघाती गोळीबार झाला. यात दोन सुरक्षा कर्मचारी जखमी झाले. राय हे पत्नीसोबत मुंबईला जाणाऱ्या विमानात चढण्यापूर्वी शस्त्र तपासणीदरम्यान ही घटना घडली. पोलिसांनी राय यांना ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे.
वाराणसी विमानतळावर गोळीबार; दोन कर्मचारी जखमी
Source: Zee 24 Taas