छन्ना हा पारंपरिक दुग्धजन्य पदार्थ असून दुग्ध उद्योगातील मूल्यवर्धित उत्पादनांमध्ये त्याचे विशेष स्थान आहे. साध्या दुधापासून नियंत्रित आम्लीकरणाद्वारे तयार होणारा छन्ना कमी खर्चिक आणि लघू उद्योजकांसाठी उपयुक्त आहे. त्यापासून रसगुल्ला, संदेश, रसमलाई, राजभोग, चमचम आणि छेना पोडा यांसारखे पदार्थ तयार होतात. पूर्व भारतात विशेषतः पश्चिम बंगाल, ओडिशा, आसाम आणि त्रिपुरा येथे छन्ना आणि त्याचे पदार्थ लोकप्रिय आहेत.
छन्ना उत्पादन: दुग्ध उद्योगातील मूल्यवर्धनाची संधी
Source: Agrowon