भाजपने माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत दिंडोरीतून पराभव झाल्यानंतरही पक्षाने त्यांच्यावरील विश्वास कायम ठेवला आहे. उत्तर महाराष्ट्रातील आदिवासी पट्ट्यात पक्षाची पकड मजबूत करण्याचे आव्हान त्यांच्याकडे असणार आहे.
भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी डॉ. भारती पवार
Source: Deshdoot