गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथे विभागीय मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र उभारण्यास शासनाने मान्यता दिली आहे. मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी कामाला गती देण्याचे निर्देश दिले आहेत. या केंद्रात आधुनिक मत्स्यपालन तंत्रज्ञान, मत्स्यबीज उत्पादन, रोग निदान आदींचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामुळे स्थानिक मच्छीमार, आदिवासी आणि बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
चामोर्शीत उभारणार आधुनिक मत्स्य प्रशिक्षण केंद्र
Source: Prahaar