शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी दाखल केलेल्या याचिकेनंतर सुप्रीम कोर्टाने शिंदे गटातील खासदार संजय देशमुख यांना नोटीस बजावली आहे. यवतमाळ-वाशिमचे खासदार देशमुख यांच्या चिंचोली येथील निवासस्थानी ही नोटीस पोहोचवण्यात आली. 31 ऑगस्ट रोजी सकाळी 10.30 वाजता सुनावणी होणार असून, गैरहजर राहिल्यास एकतर्फी सुनावणी होईल, असा इशारा देण्यात आला आहे.
शिंदे गटातील खासदार संजय देशमुख यांना सुप्रीम कोर्टाची नोटीस
Source: Zee 24 Taas