काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या गोवा दौऱ्यापूर्वी पक्षात मोठा भूकंप झाला असून तब्बल 108 बूथ लेव्हल एजंट्सनी राजीनामे दिले आहेत. निर्णयप्रक्रियेत कार्यकर्त्यांना डावलल्याच्या नाराजीतून हे राजीनामे आल्याचे सांगितले जात आहे. अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष वाशीम खान यांच्यावर झालेल्या कारवाईमुळे असंतोष वाढल्याचेही वृत्त आहे.
खरगे यांच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला धक्का; 108 बूथ एजंट्सचे राजीनामे
Source: ABP Majha