परभणीच्या जिंतूर तालुक्यातील कौसडी शिवारात बुधवारी तीन वर्षीय शेख अदनान बंद बोअरवेलमध्ये पडला. सुमारे १५ फूट खोल बोअरवेलमध्ये अडकलेल्या बालकाला दोन तासांच्या प्रयत्नांनंतर सुखरूप बाहेर काढण्यात आले. बचाव पथकाने जेसीबीच्या साहाय्याने खोदकाम करून ही कामगिरी केली. चिमुकल्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
परभणीत बोअरवेलमध्ये अडकलेल्या चिमुकल्याची सुखरूप सुटका
Source: Pudhari