कर्तव्यात कसूर; गटशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापिका निलंबित

कर्तव्यात कसूर; गटशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापिका निलंबित

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड येथील गटशिक्षणाधिकारी मोहम्मद सबाहत नईमोद्दीन यांना राज्य सरकारने निलंबित केले. 'माझी शाळा सुंदर शाळा' उपक्रम न राबविणे, पीएमश्री शाळेचा निधी अखर्चित ठेवणे आणि गणवेश वितरणात कसूर केल्याचा ठपका त्यांच्यावर आहे. तसेच चिकलठाण येथील मुख्याध्यापिका सुनीता लहाने यांनाही जिल्हा परिषदेने निलंबित केले.

Source: Maharashtra Times

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies