साताऱ्याहून पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. खंबाटकी घाटातील नवीन बोगद्यातील पुणे बाजूकडील एक लेन सात महिन्यांनंतर वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे. खंडाळा येथील जुन्या टोलनाक्यावरील उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्याने ही लेन सुरू झाली आहे. यामुळे वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवाशांचा अर्धा तास वेळ वाचणार आहे.
खंबाटकी घाटातील बोगद्यातून पुण्याची लेन वाहतुकीसाठी खुली
Source: Maharashtra Times