शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असताना भाजप आमदार प्रमोद जठार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची मागणी करणाऱ्या ठाकरेंना ते चिन्ह पेलवले नाही, असा टोला त्यांनी लगावला. दरम्यान, ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केला असून निकाल ठाकरेंच्या बाजूने लागण्याची शक्यता वकील असीम सरोदे यांनी व्यक्त केली आहे.
धनुष्यबाण पेलवले नाही; प्रमोद जठार यांचा ठाकरेंवर टोला
Source: Maharashtra Times