पिंपरीत सुरू असलेल्या १६व्या हॉकी इंडिया कनिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत झारखंड, मध्य प्रदेश, हरियाणा आणि छत्तीसगड यांनी उपांत्यपूर्व सामने जिंकून उपांत्य फेरी गाठली. झारखंडने ओडिशावर शूटआऊटमध्ये ४-३ ने मात केली, तर मध्य प्रदेशने मणिपूरचा ३-१ ने पराभव केला. हरियाणाने चंदीगडवर ३-१ ने आणि छत्तीसगडने उत्तर प्रदेशवर ५-२ ने विजय मिळवला.
पिंपरीत हॉकी स्पर्धेत चार संघांची उपांत्य फेरीत धडक
Source: Lokshahi Marathi