भंडाऱ्यातील मोहगाव करडी परिसरात खराब हवामानामुळे खासगी कंपनीचे हेलिकॉप्टर शेतात उतरवावे लागले. नागपूरहून रायपूरला जाणाऱ्या या हेलिकॉप्टरला पुढील मार्गाचे सिग्नल मिळत नव्हते. वैमानिकाने प्रसंगावधान राखत सुरक्षित लँडिंग केल्याने सर्व ९ जण सुखरूप आहेत. हवामान अनुकूल झाल्यावर हेलिकॉप्टरने पुन्हा उड्डाण केले.
भंडाऱ्यात खराब हवामानामुळे शेतात उतरले हेलिकॉप्टर
Source: Pudhari