महाराष्ट्र टीईटी पेपरफुटी प्रकरणात ठाणे पोलिसांनी भिवंडी न्यायालयात ३५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल केले असून आतापर्यंत १६ आरोपींना अटक झाली आहे. २६ जून रोजी भिवंडीतील कोनगाव येथे प्रश्नपत्रिकेचे चार संच विक्रीसाठी आणल्याप्रकरणी तिघांना अटक झाली होती, त्यानंतर २८ जूनची परीक्षा स्थगित करण्यात आली. या घटनेमुळे सुमारे सहा लाख उमेदवारांवर परिणाम झाला असून खटला जलदगती न्यायालयात चालविला जाणार आहे.
टीईटी पेपरफुटी प्रकरणात ३५०० पानी दोषारोपपत्र दाखल
Source: Pudhari