सोलापूर: ५ लाखांच्या मागणीसाठी छळ; २६ वर्षीय विवाहितेची आत्महत्या

सोलापूर: ५ लाखांच्या मागणीसाठी छळ; २६ वर्षीय विवाहितेची आत्महत्या

सोलापूरमध्ये पतीच्या व्यवसायातील नुकसानीची भरपाई म्हणून माहेरून ५ लाख रुपये आणण्याचा तगादा, शिवीगाळ व मारहाणीला कंटाळून २६ वर्षीय सादिया अहमद काजी हिने १७ सप्टेंबर रोजी राहत्या घरी गळफास घेतला. उपचारापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. लग्नाला सहा महिनेही पूर्ण झाले नव्हते. पती अहमद काजी, सासू साबिया काजी व सासरे शकील काजी यांच्याविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

Source: Prahaar

More in Crime

Read the live feed on ZapIndies