मध्य प्रदेशातून बेकायदेशीरपणे आणलेला १ कोटी १३ लाख ५४ हजार ६०० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू आणि ट्रक एफडीएने चाकण येथे जप्त केला. ६ तासांच्या पाठलागानंतर चाकण-तळेगाव चौकात ट्रक ताब्यात घेतला. चाकण उत्तर पोलीस ठाण्यात ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल असून मकोका अंतर्गत कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
चाकणमध्ये एफडीएची कारवाई; १.१३ कोटींचा गुटखा जप्त
Source: Prahaar