मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी अमोल खुणे यांच्या आरोपांचे जोरदार खंडन केले. आपण पुढील आठवड्यात मुंबईतील ईडी कार्यालयात स्वतः जाऊन चौकशीला सामोरे जाणार असून, हिंमत असेल तर अटक करा, असे आव्हान त्यांनी दिले. आरोप खोटे ठरल्यास खुणे आणि बारस्कर यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
जरांगे सहकाऱ्याचे खुणेंना आव्हान, ईडीसमोर जाणार
Source: Mumbai Tak