मुंबईतील १०८ वर्षे जुन्या ऑलिम्पिया कॉफी हाऊसचा अन्न परवाना महाराष्ट्र एफडीएने निलंबित केला. स्वयंपाकघरात मूत्रपात्रे, झुरळे, माश्या आढळल्याने आणि ३५ पैकी ३४ कर्मचाऱ्यांना अन्न सुरक्षा प्रशिक्षण नसल्याने कारवाई झाली. राज्यभरातील मोहिमेत २७ हॉटेल-रेस्टॉरंटची तपासणी झाली; १४ आस्थापनांचे परवाने निलंबित, तर १३ ना सुधारणा नोटिसा बजावल्या.
ऑलिम्पिया कॉफी हाऊससह १४ आस्थापनांचे अन्न परवाने निलंबित
Source: Pudhari