औषधाची मुदत संपली नसली तरी दमट हवा, उष्णता आणि सूर्यप्रकाशामुळे त्याची गुणवत्ता बिघडू शकते. गोळीचा रंग बदलणे, डाग पडणे, फुगणे, तडे जाणे किंवा गोळ्या चिकटणे ही खराबीची लक्षणे आहेत. सिरपचा रंग, वास किंवा घट्टपणा बदलल्यास वापरू नये. औषधे पाकिटावरील सूचनांनुसार सूर्यप्रकाश, उष्णता आणि ओलाव्यापासून दूर ठेवावीत.
मुदत संपलेली नसली तरी खराब औषधे कशी ओळखावी?
Source: Pudhari