मुंबईच्या परळ येथील अभिषेक रविंद्र चिटणीस आणि कुटुंबाने गणेशोत्सवात 'आम्ही पण मुंबईकर' संकल्पनेवर आधारित पर्यावरणपूरक देखावा साकारला आहे. ७२ वर्षांपूर्वी मुंबईच्या किनाऱ्यावर आढळलेल्या 'गोनियोब्रँकस बॉम्बेयानस' या दुर्मीळ समुद्री जीवाच्या पुनर्शोधाची कहाणी त्यात दाखवली आहे. प्लास्टिक, सांडपाणी, बांधकाम आणि हवामान बदलामुळे धोक्यात आलेल्या आंतरज्वारीय समुद्री विश्वाचे रक्षण करण्याचा संदेश यातून दिला जात आहे.
परळच्या चिटणीस कुटुंबाचा समुद्री जीवसंरक्षणाचा देखावा
Source: Prahaar