महाराष्ट्रात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांत आज विजांसह वादळी पावसाची शक्यता असून येलो अलर्ट देण्यात आला आहे. मॉन्सूनची राजस्थानच्या काही भागांतून माघार सुरू असून उत्तर अंदमान समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३६.२ अंश सेल्सिअस तर महाबळेश्वर येथे नीचांकी १७.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.
राज्यात विजांसह वादळी पावसाचा इशारा
Source: Agrowon