मडगाव येथील रहिवाशाची 35.9 लाखांची डिजिटल अरेस्ट फसवणूक केल्याप्रकरणी अटक केलेल्या बंगळुरूच्या 25 वर्षीय मोहन कुमार जी. याला मडगाव जेएमएफसी न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला. आरोपीने साथीदारांसह पोलिस असल्याचे भासवून पीडितेवर मानसिक दबाव टाकून रक्कम उकळल्याचा आरोप आहे. सायबर क्राईम पोलिस पुढील तपास करत आहेत.
डिजिटल अरेस्ट फसवणुकीत आरोपीला सशर्त जामीन
Source: Tarun Bharat