मुंबईतील काळाचौकी येथील महागणपती मंडप परिसरात शनिवारी रात्री उशिरा विजेचा धक्का लागून ८ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला, तर आणखी पाच जण जखमी झाले. जखमींमध्ये २ मुले आणि ३ मुलींचा समावेश असून त्यांचे वय ८ ते २० वर्षांदरम्यान आहे. सर्वांना मसीना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून एका मुलीला परळ येथील ग्लोबल रुग्णालयात हलवण्यात आले. पोलिस आणि अग्निशमन दल घटनेचा तपास करत आहेत.
काळाचौकीत गणपती मंडपात विद्युत शॉक; ८ वर्षीय मुलीचा मृत्यू
Source: Lokshahi Marathi