छत्रपती संभाजीनगरात २,७४० कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेतून २ लाख ३७ हजार नळ कनेक्शन देण्याचे महापालिकेचे उद्दिष्ट आहे. यापैकी ९० हजार कनेक्शन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत तर उर्वरित १ लाख ४२ हजार महापालिका देणार आहे. सध्या शहरात १ लाख ३५ हजार कनेक्शन असून बहुतांश नवी कनेक्शन नो नेटवर्क भागांतील वसाहतींना मिळणार आहेत.
छत्रपती संभाजीनगरात २.३७ लाख नळ कनेक्शन देण्याचे उद्दिष्ट
Source: Pudhari