पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सुधारित प्रारुप विकास योजनेवर (डीपी प्लान) ५६ हजार ७७९ हरकती दाखल झाल्या असून, आत्तापर्यंत निम्म्याहून अधिक हरकतींवर सुनावणी पूर्ण झाली आहे. आकुर्डीतील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात ३ ऑगस्टपासून सात सदस्यीय समिती सुनावणी घेत आहे. सोमवारपासून भोसरी, डुडुळगाव व चिखली भागातील हरकतींवर सुनावणी होणार असून, नोव्हेंबरअखेर प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
पिंपरी-चिंचवड डीपी प्लानवर ५६,७७९ हरकती; निम्म्यांवर सुनावणी पूर्ण
Source: Pudhari