मराठवाड्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पाहणीसाठी आमदार रोहित पवार यांनी बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील दगडवाडी येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली. पावसाअभावी पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकरी व शेतमजुरांसमोर आर्थिक संकट निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना हेक्टरी किमान ५० हजार रुपये, शेतमजूर कुटुंबांना २५ हजार रुपये मदत आणि जनावरांसाठी तातडीने चारा छावण्या सुरू करण्याची मागणी त्यांनी केली.
बीडमध्ये दुष्काळ पाहणी; रोहित पवारांची मदतीची मागणी
Source: Lokshahi Marathi