केतन अग्रवाल हत्या प्रकरणात तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. सिया गोयल, चेतन चौधरी आणि रितेश हांगे यांनी केतनला आधी गंभीर दुखापत करून अपंग करण्याचा कट रचल्याचा संशय आहे. परराज्यातील व्यक्तीच्या मदतीने हा कट राबवण्याचा प्रयत्न झाला, मात्र तो अडचणीत आल्याने हत्येचा निर्णय घेतल्याचे तपासातून समोर आले आहे.
केतन अग्रवाल हत्याप्रकरणात नवे वळण; आधी अपंग करण्याचा कट
Source: Lokshahi Marathi