अमरावतीतील बडनेरा परिसरातील दाभा येथे बंद घरातून ४० वर्षीय वैशालीचा मृतदेह आढळला. ती चार वर्षांपासून ललितसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती आणि दोघांत वारंवार भांडणे होत असल्याचे पोलिसांना समजले आहे. डोक्यासह अंगावर दुखापतीच्या खुणा असून, प्राथमिक शवविच्छेदन अहवालात मृत्यू 'मल्टिपल इंज्युरी'मुळे झाल्याचे म्हटले आहे. ललित बेपत्ता असून, बडनेरा पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
अमरावतीत बंद घरात महिलेचा मृतदेह आढळला
Source: Prahaar