अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव, पाथर्डी आणि नेवासा तालुक्यात जादा परताव्याच्या आमिषाने ठेवीदारांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या अनेक संस्था उघडकीस आल्या आहेत. श्री संत भगवानबाबा मल्टिस्टेट, श्री संत माऊली मल्टिस्टेट, सुवर्णबिंदू अर्बन निधी लिमिटेड आणि सुवर्णबिंदू फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेडविरुद्ध गुन्हे दाखल झाले असून तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. हजारो गुंतवणूकदारांचे पैसे व सोने अडकले असून अनेक कुटुंबांवर आर्थिक संकट ओढावले आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात आर्थिक फसवणुकीची मालिका; हजारो गुंतवणूकदारांचे पैसे अडकले
Source: Deshdoot