सुवर्णबिंदू कंपनीच्या फसवणुकीचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे

सुवर्णबिंदू कंपनीच्या फसवणुकीचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे

अमरापूरच्या सुवर्णबिंदू अर्बन निधी लिमिटेड आणि पाथर्डीच्या सुवर्णबिंदू फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेडने १३ ते १५ टक्के व्याजाचे आमिष दाखवून ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मुदतपूर्तीनंतरही रक्कम परत न दिल्याने पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशाने तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. गुंतवणूक परत न मिळालेल्यांनी मूळ कागदपत्रांसह शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Source: Deshdoot

More in Crime

Read the live feed on ZapIndies