परभणीत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात गुरुवारी रब्बी पीक परिसंवाद व कृषी प्रदर्शन झाले. पावसाच्या असमान वितरणामुळे खरीप हंगामावर दुष्काळाचे सावट असून शेतकऱ्यांनी खचू नये, अशी ग्वाही तज्ज्ञांनी दिली. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे व राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी आभासी माध्यमातून मार्गदर्शन केले. रब्बी बियाणे विक्रीला प्रारंभ होऊन 'मराठवाडा जिओपोर्टल' व 'स्त्री आरोग्य' ॲपचे उद्घाटन झाले.
रब्बी पीक परिसंवादात शेतकऱ्यांना दिलासा
Source: Agrowon