टीम इंडियाचा स्टार विराट कोहलीच्या फिटनेसचं रहस्य त्याच्या आवडत्या सुपरफूड सॅलडमध्ये दडलंय. क्विनोआ, कलिंगड, हिरव्या भाज्या आणि काजूने बनणारं हे सॅलड फायबर, प्रोटीन आणि हेल्दी फॅट्सने भरपूर आहे. 'Curly Tales' ला दिलेल्या मुलाखतीत विराटने स्वतः याबद्दल सांगितलं. बॅलन्स्ड डायट आणि फिटनेस टिकवण्यासाठी हा उत्तम पर्याय असल्याचं तो म्हणाला.
विराट कोहलीचं आवडतं सुपरफूड सॅलड, फिटनेसचं रहस्य
Source: Asianet Marathi