मुंबईत मॅट्रिमोनियल साइटवरून महिला पोलिस शिपायाशी मैत्री करून लंडनहून महागडे गिफ्ट पाठविण्याचे आमिष दाखवत ११ लाख १९ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. पश्चिम प्रादेशिक सायबर सेलने फसवणुकीसह माहिती-तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून 'रवीकुमार' नावाच्या आरोपीसह लाभार्थी खातेदाराचा शोध सुरू आहे.
मॅट्रिमोनियल साइटवरून महिला पोलिसाची ११.१९ लाखांची फसवणूक
Source: Pudhari