मराठवाड्यात दुष्काळाची तीव्रता वाढत असताना भाजप खासदार अनिल बोंडे यांचा गणपती विसर्जन मिरवणुकीतील DJ-बेंजोवरील डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. अंबाडा येथील मिरवणुकीत बोंडे उत्साहात नाचताना दिसत आहेत. यापूर्वी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या दुष्काळी बैठकीत काजू-बदामावरून वाद झाला होता. त्यामुळे दुष्काळ आणि सत्ताधाऱ्यांचे सेलिब्रेशन हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
दुष्काळात अनिल बोंडेंचा DJ डान्स व्हिडिओ व्हायरल
Source: Sarkarnama