पा. रंजीत दिग्दर्शित बहुप्रतिक्षित पॅन-इंडिया चित्रपट 'वेट्टुवम'ची 'द वर्ल्ड ऑफ वेट्टुवम' ही पहिली झलक प्रदर्शित झाली. प्राचीन युद्धकौशल्ये, जमिनीवरील वर्चस्वासाठी टोळ्यांमधील संघर्ष आणि नैसर्गिक आपत्तींचं चक्र याभोवती कथा फिरते. आर्या, शोभिता धुलिपाला, सुदीप यांच्यासह दमदार कलाकारांची फळी असून मल्लखांबही नव्या पद्धतीने सादर होणार आहे. चित्रपट पाच भाषांमध्ये डिसेंबर 2026मध्ये प्रदर्शित होणार आहे.
पा. रंजीत यांच्या 'वेट्टुवम'ची पहिली झलक प्रदर्शित
Source: Lokshahi Marathi