अमेरिकेनं पृथ्वीच्या कक्षेत 'स्पेस वेपन' तैनात केल्याची घोषणा केली आहे. हवाई दलाचे सचिव ट्रॉय मिंक यांनी शत्रूच्या कारवाईपासून संरक्षणासाठी हे आवश्यक असल्याचं सांगितलं, पण शस्त्राचं स्वरूप स्पष्ट केलं नाही. तज्ज्ञांच्या मते ते इलेक्ट्रॉनिक युद्धप्रणाली किंवा उपग्रहविरोधी शस्त्र असू शकतं. रशिया आणि चीनही अशा शस्त्रांच्या चाचण्या करत असल्याचं संशोधकांनी सांगितलं.
अंतराळात अमेरिकेचं शस्त्र तैनात, रशिया-चीनवर वरचढ?
Source: BBC Marathi