श्रीलंकेतील जाफना भागातील चेम्मानी परिसरात स्मशानभूमीच्या खोदकामादरम्यान 572 जणांचे सांगाडे सापडले आहेत. ऑगस्टपर्यंत पुरातत्व विभागाने उत्खननाचा तिसरा टप्पा पूर्ण केला. ही श्रीलंकेतील आतापर्यंतची सर्वात मोठी सामूहिक दफनभूमी असून गृहयुद्धात बेपत्ता झालेल्यांचे अवशेष असल्याचा तमिळ नागरिकांचा दावा आहे. चौकशीची मागणी करत आंदोलन सुरू आहे.
जाफनातील सामूहिक कबरीत 572 सांगाडे सापडले
Source: BBC Marathi