भूमी अभिलेख विभागाशी संबंधित प्रलंबित अर्धन्यायिक अपील प्रकरणांचा तडजोडीने निपटारा करण्यासाठी नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान राबविण्यात येणार आहे. १४ ऑगस्टच्या शासन निर्णयानुसार हे अभियान दोन टप्प्यांत होईल. नाशिक व मालेगावसाठी ७ डिसेंबर २०२६, धुळे-नंदुरबारसाठी १५ डिसेंबर २०२६, अहिल्यानगर-शिर्डीसाठी ३० डिसेंबर २०२६ आणि जळगावसाठी ६ जानेवारी २०२७ रोजी लोक अदालत होईल.
नाशिक विभागात महसूल लोक अदालत अभियान
Source: Prahaar