भाईंदर पूर्वेतील तपोवन विद्यालयात विद्यार्थ्याच्या डब्यात मेथीची भाजी आणल्याबद्दल 20 रुपये दंड आकारल्याचा दावा समोर आला आहे. मीरा-भाईंदर महापालिकेच्या शिक्षण अधिकाऱ्यांनी शाळेला भेट देऊन माहिती घेतली. मनसेचे शहराध्यक्ष रॉबर्ट डिसूजा यांनी शाळेवर गंभीर आरोप केले असून, शाळेचा दावा आहे की प्रवेशाच्या वेळीच पालकांना कंदमुळे आणू नयेत असे नियम सांगितले होते. शाळा बुधवारपर्यंत खुलासा सादर करणार असून, नियमभंग आढळल्यास कारवाई होईल.
तपोवन विद्यालयात डब्यातील मेथी भाजीवर 20 रुपये दंडाचा दावा; चौकशी सुरू
Source: Lokshahi Marathi