भेसळीविरोधात एफडीएची मोहीम; ३०.८२ लाखांचा मुद्देमाल जप्त

भेसळीविरोधात एफडीएची मोहीम; ३०.८२ लाखांचा मुद्देमाल जप्त

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न-औषध प्रशासनाने (FDA) महाराष्ट्रभर धडक कारवाई करत १०,८३६ किलो भेसळयुक्त व निकृष्ट दर्जाचा साठा जप्त केला. या मुद्देमालाची किंमत सुमारे ३०.८२ लाख रुपये असून मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर व नागपूर विभागांतील १८ आस्थापनांवर कारवाई झाली. मुंबईतील पाच आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले असून मालाडमध्ये 'पूजा तूप' नावाखाली दिशाभूल करणारे लेबल आढळले.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies