आयआयटी मुंबईतील द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर सुरू झालेले आंदोलन मंगळवारीही सुरू राहिले. मुख्य प्रवेशद्वारावर ३० ते ४० विद्यार्थ्यांनी ठिय्या दिला असून, प्राध्यापक सूर्यनारायण दुल्ला यांच्याविरोधातील तक्रारीची निष्पक्ष चौकशी आणि चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना जबाबदाऱ्यांपासून दूर ठेवण्याची मागणी केली जात आहे. विद्यार्थ्यांत दोन गट असून, एक गट संस्थेच्या भूमिकेला पाठिंबा देत निष्पक्ष चौकशीची मागणी करत आहे.
आयआयटी मुंबईत विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच; दोन गटांत मतभेद
Source: Pudhari