उच्च शिक्षण विभागाने अनुदानित महाविद्यालये आणि अकृषी विद्यापीठांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे नियमित वेतन दर महिन्याच्या १ तारखेलाच देण्याचे आदेश दिले आहेत. तासिका मानधन, अर्जित रजा रोखीकरण व वैद्यकीय प्रतिपूर्तीसाठीची अनुदान मागणी २० तारखेपर्यंत संचालनालयाकडे सादर करावी लागणार आहे. त्यामुळे वेतन विलंबाला आळा बसून प्रक्रियेत पारदर्शकता येण्याची अपेक्षा आहे.
शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा पगार १ तारखेलाच जमा होणार
Source: Sarkarnama