२४ सप्टेंबर १८७३ रोजी महात्मा जोतीराव फुलेंनी ६० कार्यकर्त्यांसह सत्यशोधक समाजाची स्थापना केली. जातिभेद, पुरोहितशाही आणि सामाजिक गुलामगिरीविरोधात संघटित लढा उभारणे, शूद्र-अतिशूद्रांना शिक्षण व मानवी हक्क मिळवून देणे ही त्याची ध्येये होती. पुणे, मुंबई, सातारा, जळगाव, बेळगाव आदी भागांत चळवळ पसरली. दारूबंदी, सक्तीचे शिक्षण, पुरोहितमुक्त विवाह आणि शेतकरी प्रश्न हे त्याचे प्रमुख मुद्दे होते.
सत्यशोधक समाजाची स्थापना: १८७३ मधील सामाजिक क्रांतीचा वारसा
Source: Max Maharashtra