राज्य सरकारने ‘मिशन महाग्राम’ अभियानाला २०२९ पर्यंत मुदतवाढ दिली असून, निवड झालेल्या प्रत्येक गावाला १० लाख रुपयांचा विशेष निधी मिळणार आहे. पाणी, आरोग्य, शिक्षण, रस्ते, स्वच्छता आणि डिजिटल कनेक्टिव्हिटी या मूलभूत सुविधांवर भर दिला जाईल. कमी शैक्षणिक, आरोग्य आणि आर्थिक निर्देशांक असलेल्या तसेच दारिद्र्यरेषेखालील कुटुंबे व वंचित घटकांचे प्रमाण अधिक असलेल्या गावांना प्राधान्य. महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाउंडेशन अंतिम यादी जाहीर करणार.
मिशन महाग्रामला २०२९ पर्यंत मुदतवाढ; प्रत्येक गावाला १० लाख निधी
Source: Sarkarnama