मुंबईत गणेश विसर्जनासाठी २२ हजारांहून अधिक पोलीस तैनात

मुंबईत गणेश विसर्जनासाठी २२ हजारांहून अधिक पोलीस तैनात

अनंत चतुर्दशीनिमित्त मुंबईत गणेश विसर्जन मिरवणुका शांततेत पार पडाव्यात यासाठी मुंबई पोलिसांनी विशेष बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. शहरात २२ हजारांहून अधिक पोलिस कर्मचारी तैनात असून यात ६ सहआयुक्त, ९ अतिरिक्त आयुक्त, ३८ उपआयुक्त, ६६ सहायक आयुक्त, ३,२१३ अधिकारी आणि सुमारे १८,९०० अंमलदारांचा समावेश आहे. गर्दीवर ड्रोन व सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवली जाणार असून वाहतूक पोलिसांनी सुरळीत वाहतुकीसाठी विशेष मार्ग आखले आहेत.

Source: Lokshahi Marathi

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies