लहान मुलांना शांत ठेवण्यासाठी दिला जाणारा मोबाईल त्यांच्या भाषा विकासावर आणि सामाजिक कौशल्यांवर विपरीत परिणाम करत असल्याचे तज्ज्ञांनी नमूद केले आहे. स्क्रीन-आधारित वातावरणामुळे मुलांमध्ये बोलण्यास उशीर, नजरेचा संपर्क कमी होणे आणि पुनरावृत्ती वर्तन यांसारखी लक्षणे दिसत आहेत, ज्याला 'व्हर्च्युअल ऑटिझम' म्हटले जात आहे. हा विकार ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डरसारखा असला तरी मेंदू दोष नसून आभासी दुनियेच्या अतिवापरामुळे उद्भवतो.
मोबाईलमुळे मुलांमध्ये 'व्हर्च्युअल ऑटिझम' वाढतोय
Source: Max Maharashtra