गणेशगल्लीच्या ‘मुंबईचा राजा’च्या ९९ व्या वर्षातील विसर्जन मिरवणुकीवर परवानगीचे विघ्न आले आहे. शुक्रवारी २५ सप्टेंबरला अनंत चतुर्दशीच्या दिवशी मिरवणूक काढण्याचे नियोजन असताना पालिका व पोलिसांची परवानगी अद्याप मिळालेली नाही. मंडळाने मेरीटाईम विभागाची परवानगी घेतली असून गिरगाव चौपाटीवर बार्जद्वारे खोल समुद्रात विसर्जनाचे नियोजन केले आहे. परवानगी न मिळाल्यास मिरवणूक न काढण्याचा निर्णय मंडळाने घेतल्याचे समजते.
मुंबईच्या राजाच्या विसर्जनाला परवानगीचा पेच
Source: Lokshahi Marathi