मीरा-भायंदर महापालिकेने ठरलेल्या जागांव्यतिरिक्त भटक्या श्वानांना खाद्य दिल्यास ५ हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे. प्राणीमित्र रोशन पाठक यांच्या तक्रारीनंतर जिल्हा पशुसंवर्धन विभागाने या आदेशाची कायदेशीर वैधता तपासण्याचे निर्देश दिले असून सात दिवसांत अहवाल मागवला आहे. अस्वच्छता, दुर्गंधी आणि अन्नाची नासाडी रोखण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे.
भटक्या श्वानांना खाद्य दिल्यास ५ हजारांचा दंड; पशुसंवर्धन विभागाकडून चौकशी
Source: Prahaar