इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी संयुक्त राष्ट्र महासभेतील भाषणात न्यूयॉर्कचे महापौर झोहरान ममदानी यांच्यावर ज्यूविरोधी असल्याचा आरोप करत टीका केली. त्यांनी ममदानी यांच्या पत्नी रमा दुवाजी यांनी ७ ऑक्टोबरच्या हल्ल्याचे समर्थन करणाऱ्या पोस्ट लाईक केल्याचा दावाही केला. ममदानी यांनी हे आरोप फेटाळून नेतन्याहूंविरोधात आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाचे अटक वॉरंट असल्याचे सांगितले.
संयुक्त राष्ट्र महासभेत नेतन्याहूंनी ममदानी आणि त्यांच्या पत्नीवर टीका केली
Source: BBC Marathi